गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 12 डिसेंबर 2018 (11:40 IST)

पंतप्रधान मोदींनी मान्य केला पराभव

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी पराभव मान्य केला असून काँग्रेसला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही जनतेचा जो कौल आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या जनतेने आम्हाला त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
या राज्यातील भाजप सरकारांनी जनतेच्या कल्याणासाठी अथक मेहनत घेतली असे मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी तेलंगणामधील विजयासाठी तेलंगणा राष्ट्र समिती आणि मिझोरममधील मिझो नॅशनल   फ्रंटलाही विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाने दिवस-रात्र मेहनत केली. मी त्यांच्या मेहनतीला सलाम करतो. जय आणि पराजय हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे.