रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (10:37 IST)

राम मंदिर निर्माणासाठी आता आंदोलन नाही

राम मंदिर निर्माण करण्यासाठी  अयोध्येत  आता कुठलेही आंदोलन करण्यात येणार नाही, कोणीही कार्यकर्ता पोलिसांची गोळी खाणार नाही, कोणी ही तुरुंगात जाणार नाही, तर राम मंदिर निर्माण करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची  आहे. या सरकारने संसदेत कायदा करावा आणि  अयोध्येत राम मंदिर निर्माण करावे. अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली असून ती जाहीर केली आहे. तोगडिया  नागपुरात बोलत होते.   तोगडिया यांनी  राम मंदिरासंदर्भात संसदेत कायदा करावा या मागणीसाठी पंतप्रधान यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. देशातील 20 कोटी बेरोजगार युवकांना रोजगार मिळाने गरेजेचे असून यामध्ये  सर्वांना शिक्षण  मिळावे तर सोबत  शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशीही मागणी डॉ. तोगडिया यांनी यावेळी केली आहे.