शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (17:27 IST)

यंदाचे मॅगसेस पुरस्कार जाहीर

यंदाच्या रॅमन मॅगसेस पुरस्कार सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.
 
भारत वाटवानी यांनी पदराचे पैसे खर्च करून रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली. तर सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली.