सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:40 IST)

जेलमध्ये सलमान खानला आसाराम बापूची साथ ?

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूरच्या कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्याचा तुरुंगवास अटळ आहे. सलमानची सेंट्रल जेलमध्ये रवानगी होणार असून तिथे तो आसाराम बापूसोबत राहण्याची शक्यता आहे. सलमानला सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये ठेवलं जाऊ शकतं. याच बराकमध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेला आसाराम बापूही कैद आहे. मागच्यावेळी शिक्षेनंतर सलमानला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं. तो सात दिवस या तुरुंगात कैद होता. त्याची ओळख कैदी नंबर 343 अशी होती.