रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2016 (11:39 IST)

Sealdah Ajmer Express derail: कानपुरमध्ये परत रूळावरून घसरली ट्रेन

कानपुरमध्ये परत एक ट्रेन अपघात झाला. बुधवार (28 डिसेंबर)च्या सकाळी 6च्या दरम्यान अजमेर-सियालदाह ट्रेनचे 14 डबे रुळावरून घसरले आहे. अपघातात दोन लोकांनी आपले प्राण गमावले आहे आणि किमान 24 लोग जखमी झाले आहे. उत्तरी-मध्य रेल्वेचे पीआरओ अमित मालवीय यांनी सांगितले की अपघात रूरा रेल्वे स्टेशनजवळ झाला. अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसचे (12988) 14 डबे पहाटे साडे पाचच्या सुमारास रुळावरुन घसरले आहेत अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच कानपूर रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 
 
या अपघाताच्या किमान एक महिना अगोदर 20 नोव्हेंबरला कानपुर देहात जिल्ह्यात इंदौर-पटना एक्सप्रेसचे 14 डबे रूळावरून उतरले होते. अपघातात 150पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, जेव्हाकी 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.  
 
अमित मालवीय यांनी सांगितले की कानुपरच्या रस्त्यावरून जाणारी दिल्ली-हावड़ा मार्गला अस्थाईरीत्या बंद करण्यात आले आहे आणि  दिल्ली-कानपुर शताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहे …. कानपुरसाठी … 0512-2323015, 2323016 आणि इलाहाबादसाठी … 0532-2408149, 2408128.