शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (16:46 IST)

उत्तर गोव्यात पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

child death
उत्तर गोव्यातील अंजुना गावात 'पिटबुल' जातीच्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तसेच कुत्र्याचा मालक  यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार प्रभास कलंगुटकर हा 7 वर्षाचा चिमुरडा त्याच्या आईसोबत फिरत असताना 'पिटबुल'ने त्याच्यावर हल्ला केला, व 'पिटबुल' याला पट्ट्याने बांधलेले नव्हते. पोलीस अधिकारींनी सांगितले की,  मुलाला गोवा रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्याचा मृत्यू झाला.
 
तसेच पशुसंवर्धन मंत्री नीलकांत हलर्णकर म्हणाले की, राज्य सरकारने काही आक्रमक कुत्र्यांच्या पैदाशीवर बंदी घातली होती, पण त्यांच्या मालकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तसेच काही धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.