शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अबब, युवक बनला स्वयंभू राजा, वडिलांना केले पंतप्रधान

भारतातील इंदूर येथे राहणाऱ्या सुयश दीक्षित या युवकाने अगदी खरोखर स्वत:च्या देशाची निर्मिती केली आहे. इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये असे एक ठिकाण आहे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. आता याच संधीचा फायदा घेत सुयशने त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली आहे. इतकेच नाही तर त्याने हा प्रदेश म्हणजे एक नवा देश असल्याचे सांगत त्याचे नाव ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असे ठेवले आहे.

नव्या देशाची घोषणा सुयशने फेसबुकवर केली आहे. त्याने स्वत:ला या देशाचा राजा घोषित केले आहे. तसेच या देशाचा झेंडा ही सुयशने शेअर केलाय. सुयशने ज्या प्रदेशाचे नाव ‘किंगडम ऑफ दीक्षित’ ठेवले आहे त्याचे मुळ नाव ‘ताविल’ असे आहे. दरम्यान, सुयशने संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.
 
नव्या देशाची घोषणा करताना सुयशने यासाठी 319 किलोमीटरचा प्रवास केल्याचे सांगितले. या ठिकाणी येण्यासाठी निघालो तेव्हा इजिप्तमध्ये दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते. हा प्रदेश संपूर्ण वाळंवटी आहे. 900 स्क्वेअर मीटरचा हा प्रदेश कोणत्याही देशाच्या मालकीचा नाही. मी आता येथे आरामात राहू शकतो, असे सुशयने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या जागेवर झाड लावत असल्याचा फोटो त्याने शेअर केला आहे. 
 
नव्या देशाची घोषणा केल्यानंतर सुयशने स्वत:च्या वडिलांची पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.