बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 16 जुलै 2018 (16:38 IST)

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये जवळपास ३० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सर्व जखमींना मिदनापूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मिदनापूर येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरू होती. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी भाजप आणि मोदी समर्थक मोठी गर्दी केली होती. परंतु मोदींचे भाषण सुरू असतानाच मंडप कोसळला. याची माहिती मिळताच मोदींनी एसपीजी पथकाला तात्काळ सूचना देऊन जखमींना मदत करण्यास सांगितले. तसेच सभा संपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची विचारपूसही केली.