1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (18:20 IST)

उत्तरप्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना मंत्रिगटाच्या बैठकीत सहभागी

उत्तर प्रदेश सरकारमधील अर्थमंत्री सुरेश खन्ना नवी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कल्पवृक्ष कक्षात मंत्रिगटाच्या बैठकीत सहभागी झाले
 
उत्तरप्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला असून राज्याची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे राज्याचा जीएसडीपी आता 17 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. केंद्र सरकारने त्यांना मदत करावी, अशी सर्व राज्यांची नेहमीच अपेक्षा असते. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर खन्ना म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत यूपीमध्ये हा दर सर्वात कमी आहे.
 
राज्यातील वीज संकटाबाबत बोलताना ते म्हणाले की, वीजपुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच ही समस्या दूर होईल. अनेक ठिकाणी कोळशाचा तुटवडा होता पण आता परिस्थिती सामान्य होत आहे.
 
राज्यातील गुन्हेगारीबाबतही अर्थमंत्री उघडपणे बोलले, राज्यात गुन्हेगारी कमी झाल्याचे ते म्हणाले.गुन्हेगारांवर आणि गुन्हांवर युपी सरकार ने आळा घातला आहे. आता गुन्हेगार पळून जाऊ शकणार नाही.