रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोण आहे नीरव मोदी? 11000 कोटींचा दरोडेखोर

तसं तर नीरव मोदी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या सूचीत सामील आहे परंतू पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतर नीरव मोदी आता ईडीच्या रडारवर आहे. एका क्षणात नायक ते खलनायक श्रेणीत आल्यावर नीरवसह त्यांच्या मामाच्या कंपनीचे नावही चर्चेत आहे.
 
मोदी बेल्जियमच्या ऐंटवर्पमध्ये हिरे व्यापारी कुटुंबाशी जुळलेले आहे. व्यावसायिक वातावरणात वाढलेले नीरव नेहमी म्हणायचे की त्यांना कौटुंबिक व्यवसायात रुची नाही. पण ते वॉर्टनमध्ये फायनंस पाठ्यक्रमात अयशस्वी ठरले आणि शेवटी त्यांना हिर्‍याच्या व्यवसायात येणे भाग पडले. 
 
या प्रकारे सुरुवात: हिरे व्यवसायातील धडे शिकवण्यासाठी 19 वर्षाच्या वयात मोदीला त्याच्या मामा आणि गीतांजली जेम्सचे चेयरमॅन मेहुल चोकसी यांच्याकडे मुंबईला पाठवण्यात आले. 1999 साली त्यांनी दुर्लभ हिर्‍याच्या व्यापारासाठी फायरस्टार डायमंड नामक कंपनी स्थापित केली आणि बघता-बघता अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केले. आज त्यांचे ज्वेलरी स्टोअर लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहे. भारतात दिल्ली आणि मुंबईत त्यांचे स्टोअर आहे. याच मजबूत नेटवर्कमुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. भारताव्यतिरिक्त त्यांची रूस, अर्मेनिया आणि दक्षिण आफ्रिका मध्येही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे.
 
2010 साली त्यांचा एक नेकलेस हाँगकाँग मध्ये 22.4 कोटी रुपयात लिलाव झाला होता. 2005 साली नीरव मोदीने फ्रेडरिक गोल्डमॅन कंपनी विकत घेतली होती जी अमेरिकेत त्यांची सर्वात मोठी ग्राहक होती. ही कंपनी मोदीच्या कंपनीपेक्षा 7 पट मोठी होती. 
 
दिल्लीत पहिले बुटिक : त्यांनी 2014 साली आपले पहिले मोठे बुटिक दिल्लीच्या डिफेंस कॉलोनीमध्ये सुरू केले. दुसर्‍याच वर्षी 2015 मध्ये मुंबईच्या काला घोडा क्षेत्रात एक स्टोअर उघडले. या वर्षीच न्यूयॉर्कच्या मॅडिसन अवेन्यूमध्येही एक स्टोअर उघडले. ज्यात नाओमी वाट्स, निमरत कौर आणि लिसा हेडन सारखे सितारे उद्घाटन समारंभात सामील झाले होते.
नीरवच्या डायमंडची चमक बॉलीवूडच नव्हे तर हॉलिवूडच्या स्टारर्सवरही दिसून आली. कॅट विंस्लेट, डकोरा जॉन्सन, टराजी पी हेन्सन इतर हॉलिवूड स्टार्स नीरवचे डायमंड घालून रेड कार्पेटवर उतरलेले आहे. या ब्रँडला प्रियांका चोप्रा, एंड्रिया डायाकोनु आणि रोजी हंटिंगटन सारखे स्टार प्रमोट करतात. नीरवचे नाव आणि संपत्ती एवढी वाढली की 2013 साली ते फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या सूचीत जागा पटकवण्यात यशस्वी ठरले. मुंबईचे प्रतिष्ठित म्युझिक शॉप रिदम हाउस देखील त्यांनी कथित रूपाने 32 कोटी रुपय्यात खरेदी केले होते.
 
रणनीती जी यशस्वी ठरली: नीरवने 2009 च्या विश्वव्यापी मंदी दरम्यान खरेदी केलेल्या काही दुर्लभ हीर्‍यांमुळे त्यांना खूप लाभ झाला. 2010 मध्ये ब्रिटिश ऑक्सन हाउस क्रिस्टीजने मोदीचे 12 कॅरटचे गोलकुंडा लोटस नेकलेसला आपल्या कॅटलॉगच्या कव्हरवर जागा दिली आणि लिलावाची रक्कम 16 कोटीहून अधिक ठेवली. सुमारे 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की एखाद्या भारतीय ज्वेलरसाठी क्रिस्टीजने बोली लावली असेल.
 
...आणि मग पीएनबी घोटाला : यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत सुमारे 11 हजार 420 कोटी रुपये (177 कोटी डॉलर) चे बोगस व अनधिकृत व्यवहार प्रकरण प्रकाशात आले. या पूर्ण प्रकरणात मामा-भाच्याचा हात असल्याची खबर आहे. बँकेने सीबीआयकडे तक्रार नोंदवली आहे. बँकेच्या संदिग्ध व्यवहार प्रकरणी अब्जाधीश आभूषण व्यवसायी नीरव मोदी आणि एक आभूषण कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.