रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:29 IST)

उत्तरप्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्ट्या बंद

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  राज्यात महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या नावाने सर्वाधिक सुट्ट्या दिल्या जातात. महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला सुटी देण्यापेक्षा त्यादिवशी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये बोलावून दिवसातले दोन तास त्या महापुरुषाची माहिती देण्याची सूचना यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याची घोषणाही यावेळी केली आहे.