मंगळवार, 8 एप्रिल 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (09:31 IST)

देवी आईच्या 51 शक्तीपीठ बद्दल माहिती, शिव आणि शक्तीची कथा

नवरात्र च्या नऊ दिवसात देवी आईच्या नऊ स्वरूपाची पूजा करतात. देवी आईंच्या शक्तिपीठाचे फार महत्व मानले गेले आहे. नवरात्राच्या दिवसात यांचे महत्व अधिक वाढतं. आई दुर्गेने दुष्टांचा संहार आणि पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी अनेक रूपे घेतली. या पैकी एक रूप सतीचे होते. ज्यांनी शिवाशी लग्न केले. इथूनच आई सती बनण्याची गोष्ट सुरु होते. भगवान शिव आणि आई सतीची गोष्ट, कश्या प्रकारे देवी आईच्या 51 शक्ती पीठांची निर्मिती झाली.
 
पुराणानुसार प्रजापती दक्ष ब्रह्माच्या मानसपुत्रांपैकी एक होते. यांच्या दोन बायका होत्या ज्यांचे नाव प्रसूती आणि वीरणी असे होते. राजा दक्ष यांचा पत्नीच्या पोटी माता सतीने जन्म घेतला. एका पौराणिक कथेनुसार आई सती शिवजींशी लग्न करण्यास इच्छुक होत्या. पण राजा दक्ष या लग्नाच्या विरोधात होते. त्यांना भगवान शिवाची जीवनशैली आणि वेशभूषा आवडत नसे. तरी ही त्यांना त्यांचा मनाविरुद्ध आपल्या मुलीचे लग्न शिवाशी करावे लागले.
 
एकदा राजा दक्षाने एक भव्य असे यज्ञाचे आयोजन केले असताना त्यांनी सर्व देवी-देवांना त्याचा साठी आमंत्रण दिले.परंतु शिव आणि सतीला आमंत्रण दिलेच नाही. आई सती या बिना आमंत्रणाच्या शिव ने रोखलेले असताना आपल्या पिता कडे गेल्या. तिथे गेल्यावर प्रजापती दक्ष यांनी भगवान शिव साठी अपशब्द वापरले आणि त्यांचा अवमान केला. आपल्या पतीच्या अवमानाला सती सहन करू शकल्या नाही आणि त्यांनी त्याच यज्ञ कुंडात आपल्याला भस्मसात केले. भगवान शिवाला हे कळल्यावर ते फार चिडले आणि दुखी झाले. त्यांनी वीरभद्राला तिथे पाठविले. वीरभद्राने संतापून राजा दक्षाचे शिरविच्छेद केले. त्यानंतर शिव माता सतीच्या प्रेताला घेउन संतापून दुखी मनाने तांडव करू लागले. हे बघून साऱ्या देवी देवांना काळजी वाटू लागली. भगवान शिवाची तंद्री तुटावी म्हणून भगवान विष्णूनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या प्रेताचे तुकडे पाडले. माता सतीच्या देहाचे ते भाग आणि दागिने ज्या ज्या स्थळी पडले त्या त्या स्थळी देवी आईचे शक्तीपीठ बनले. अश्या प्रकारे एकूण 51 शक्तीपीठ उल्लेखित आहे.