1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (11:46 IST)

नवरात्री 2020 : काय सांगता गरबा आणि ते देखील ऑनलाईन जाणून घ्या काही मनोरंजक टिप्स

नवरात्रोत्सवात शृंगार किंवा मेकअप करण्याचे वेगळेच महत्व आहे, गरब्यात भाग घेण्याचा उत्साह सर्वांनाच असतो. मग तो तरुण असो, लहान असो किंवा वृद्ध असो सर्वांना गरब्यात भाग घेण्याचा प्रचंड उत्साह असतो. पण यंदा कोरोनाच्या काळात या उत्सवाला पूर्वी प्रमाणे साजरे करता येणार नाही, ज्या प्रमाणे दणक्यात आणि उत्साहात साजरे करीत होतो. पण निराश न होता सध्याचा कोरोनाकाळात देखील आपण या खास प्रसंगाला उत्साहाने खास बनवू शकता. आणि तेही सामाजिक अंतराची काळजी घेउन. त्यामुळे आपण नियम देखील काटेकोर पाळू शकाल आणि आपल्या उत्साहात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही.
 
सध्याच्या काळात वाढदिवस देखील ऑनलाईन साजरे केले जात आहे, अभ्यास देखील ऑनलाईन होत आहे, ऑफिसचे काम देखील ऑनलाईन होत आहे, तर मग गरबा ऑनलाईन का होऊ शकत नाही? होय, आपण देखील आपल्या यंदाच्या नवरात्रीला खास बनवू शकता, आणि ते देखील काही ही नियमांना न मोडता. ऑनलाईन गरब्यामध्ये आपण वर्दळीच्या जागीसुद्धा जाणार नाही, तसेच अधिकाधिक लोकांशी देखील संपर्क साधता येणार नाही. पण आपल्याला आनंद अधिक येणार आणि त्याबरोबर मज्जा देखील येणार. 
 
होय, या साठी सर्वात आधी आपल्याला आपला एक गट तयार करायला हवा, जे आपल्या बरोबर गरब्याचा आनंद घेउ इच्छित आहे. चला जाणून घेउ या नवरात्रीत ऑनलाईन गरब्यासाठीच्या काही मनोरंजक टिप्स -
 
* आपण सर्वजण आप-आपल्या घरातच राहून गरब्याच्या वेशभूषेत तयार होऊन या खास प्रसंगाला अधिकच खास बनवू शकता. 
* आपण उत्कृष्ट ड्रेस आणि उत्कृष्ट डान्सर देखील निवडू शकता. म्हणजे ज्या प्रकारे आपण गरबा खेळण्यासाठी जात होता त्याच प्रमाणे उत्साहाने ऑनलाईन गरब्यात देखील भाग घ्या.
* गरब्यांच्या गाण्यांची यादी आधीच तयार करुन ठेवा. 
* गरब्याचा सराव करण्यासाठी आपण आधी पासूनच आपलं गट तयार करा. 
* एक ठराविक वेळ ठरवून घ्या आणि आपल्याला संपूर्ण गटासह त्याच वेळी गरब्याचा सराव करावयाचा आहे.
* संपूर्ण गरब्याच्या गेटअपनुसार तयार होणं आवश्यक आहे. आपण हा विचार करू नका की आपण घरातच आहोत तयार कशाला तयार व्हायचं ? ज्याप्रमाणे दर वर्षी आपण तयार होऊन गरब्यात भाग घेण्यासाठी जाता त्याच प्रमाणे आपणांस तयार व्हायचे आहे. 
* पार्लरला जाण्या ऐवजी आपण घरातच स्वतःला तयार होऊ शकता. 
* दररोज साठी आपण एखादी थीम देखील ठरवू शकता, जसे की काठियावाडी आणि काळबेलिया थीमसाठी राजस्थानी मेकअप परिपूर्ण दिसेल. 
* आगळे वेगळे दिसण्यासाठी आपण रेनबो आणि स्मोकी मेकअप करू शकता, त्याच्यासह आपण इंडो-वेस्टर्न गरबा ड्रेस देखील वापरून बघू शकता. 
* आपण जोडप्यांमध्ये येऊन बॉलिवूड स्टाईल लूक देखील तयार करू शकता. अश्या प्रकारे आपण दररोज वेगवेगळी शैली वापरून या उत्सवाला अजून खास बनवू शकता.