बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (15:33 IST)

48MP कॅमेर्‍यासह लॉन्च Redmi Note 7S, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अखेर भारतात आपला नवीन स्मार्टफोन Redmi Note 7S लॉन्च केला आहे. यात 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रीअर कॅमेरा आहे. या व्यतिरिक्त Redmi Note 7S मध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. मग चला जाणून घ्या या फोनची किंमत आणि तपशीलबद्दल.
 
* Redmi Note 7S तपशील - यात 6.3 इंच फुल एचडी प्लस वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2340×1080 पिक्सेल आणि आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 512 जीपीयू, 3GB/4GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये अँड्रॉइड पाई 9.0 आधारित MIUI 10 मिळेल. मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज 256GB पर्यंत वाढविण्यात येईल. 
 
* Redmi Note 7S कॅमेरा - यात ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सेल आणि f/1.8 अपर्चरचा आहे तर दुसरा 5 मेगापिक्सेलचा आहे. तिथेच या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेर्‍यासह आपल्याला PDAF, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्टसह पोर्ट्रेट मोड देखील मिळेल. फ्रंट कॅमेर्‍यासह फेस अनलॉक मिळेल. 
 
* Redmi Note 7S बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी - या फोनामध्ये 4000 एमएएचची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक असेल. या फोनच्या मागे आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. फोनमध्ये हायब्रीड सिम कार्ड स्लॉट मिळेल. अशा प्रकारे आपण एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एका सिमसह एक मेमरी कार्ड वापरण्यास सक्षम असाल. 
 
* Redmi Note 7S किंमत - Redmi Note 7S च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन ऑनिक्स ब्लॅक, रुबी रेड आणि सफायर कलर व्हेरिएंटमध्ये मिळेल. फोन 23 मेपासून फ्लिपकार्ट, एमआय स्टोअर आणि एमआय डॉट कॉम वर विकला जाईल.