बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2019 (16:55 IST)

Xiaomi Mi Notebook Air चा अपग्रेडेड व्हर्जन लाँच

Mi ने Notebook Air चा अपग्रेडेड व्हर्जन चीनमध्ये लाँच केला. या नोटबुकची टक्कर अॅपलच्या मॅकबुकशी होईल. तथापि दुसर्या देशात ते कधी लॉन्च होईल, यावर कंपनीकडून कोणतेही वक्तव्य दिले गेले नाही. Xiaomi
ने Notebook Air ला Intel i5 प्रोसेसरच्या 8th जनरेशनसह लॉन्च केलं आहे. कंपनीने यात 4 जीबी रॅम दिली आहे, जेव्हा की वेगळ्या-वेगळ्या व्हेरिएंटमध्ये 128 जीबी आणि 256 जीबी एसएसडी स्टोरेज प्रदान केले आहे.
 
चीनमध्ये Notebook Air च्या तीन्ही व्हेरिएंट 28 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. Intel Core m3 सीपीयू आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 38 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. Intel Core m3
सीपीयू आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 43 हजार रुपये राहील. i5 आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत सुमारे 46 हजार रुपये राहील. बातम्यानुसार तीन्ही व्हेरिएंट्समध्ये फुल एचडी डिस्प्ले असेल.
 
Notebook Air चे वजन फक्त 1 किलोग्रॅम आहे. हे फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो आणि 50 मिनिटांत 50 टक्क्यांहून अधिक चार्ज होऊ शकतो.
 
Notebook Air मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, यूएसपी 3.0 पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि फुल बॅक लाइट कीबोर्ड दिलेला आहे. Notebook Air चे तीन्ही व्हेरिएंट Windows 10 च्या होम एडिशनसह येतात.