गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

स्वस्त झाले Nokia चे हे दोन अँड्रॉइड स्मार्टफोन, जाणून घ्या किती फायदा मिळणार

एचएमडी ग्लोबलने अलीकडेच भारतात नोकिया 2.2 लॉन्च केला आहे. हा जगभरातील सर्वात स्वस्त अँड्रॉइड वन फोन असल्याचं सांगितलं जात आहे. आता कंपनीने देखील आपल्या दोन स्मार्टफोन नोकिया 3.2 आणि नोकिया 4.2 च्या किमतीत 2,100 रुपयांची कपात केली आहे. जाणून घ्या कितीत पडतील हे मॉडल्स-
 
कपात केल्यानंतर आता ऍमेझॉनवर नोकिया 3.2, 8,150 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या किमतीत 2 जीबी रॅमसह 16 जीबी स्टोरेज वेरियंट मिळेल. तसेच या फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरियंटला 9,410 रुपयात खरेदी करता येईल. तसं तर नोकियाच्या वेबसाइटवर नोकिया 3.2 चा 2GB/16GB वेरियंट 8,490 रुपयात उपलब्ध आहे.
 
आपल्याला माहीत असावे की याची किंमत 8,990 रुपये आहे. तसेच नोकिया 4.2 ला ऍमेझॉनहून 9,690 रुपयात खरेदी करता येईल. हा फोन देखील नोकियाच्या साईटवर आता 10,490 रुपयात उपलब्ध आहे. तथापि ऍमेझॉनवर या दोन्ही फोनच्या किमतीवर कपात केवळ 30 जून पर्यंत आहे.
 
नोकिया 4.2 स्पेसिफिकेशन
फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचं तर या फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्स अँड्रॉइड पाई 9.0 मिळेल. या फोनमध्ये 5.71 इंची एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर 2.5डी कर्व्ड ग्लास मिळेल. या फोनमध्ये 2/3 जीबी रॅम आणि  16/32 जीबी स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल. या व्यतिरिक्त फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर मिळेल आणि ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 505 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) देण्यात आले आहे.
 
कॅमेर्‍याबद्दल सांगायचं तर या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक कॅमेरा f/2.2 अपर्चरसह 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, पॉवर बटणात पांढरी नोटिफिकेशन लाइट, 4जी, एफएम रेडियो, एनएफसी आणि 3.5एमएमचा हेडफोन जॅक मिळेल. फोनमध्ये 3000एमएएचची बॅटरी मिळेल.