गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (15:01 IST)

10 GB आणि 5 GB सपोर्टचा स्मार्टफोन येतोय?

Xiaomi मोबाइल कंपनीने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi MIX  3 ची माहिती जाहीर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने एका टीझरमध्ये लाल रंगाच्या दोन हँडबुकवर 5जी आणि 10 जीबी असे लिहिले आहे. त्यामुळे असे समजते की, शाओमी स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी असणारी ही पहिली कंपनी असणार आहे. याशिवाय, 10 जीबी रॅम असणारा शाओमी कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम  याशिवाय, टीझर पोस्टरवरुन Xiaomi Mi MIX 3 स्मार्टफोनमध्ये स्लायडर कॅमेरा सिस्टिम दिली जाणार आहे. कंपनीने याआधी वीवो आणि ओप्पो स्लायडर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्टबाबत शाओमी कंपनीने स्पेनमध्ये स्पष्टीकरण दिले होते. कंपनीने वीबो पोस्टमध्ये 10 जीबी रॅम असल्याचा टीझर जारी केला आहे. दरम्यान, 2019 मध्ये जगभरातील अनेक भागात 5जी नेटवर्क होण्याची शक्यता आहे.