शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (13:16 IST)

Xiaomiचे भारतात 10 हजार रिटेल दुकान उघडण्याची योजना

चीनच्या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी शाओमीने अशी आशा दाखवली आहे की या वर्षाच्या शेवटापर्यंत भारतात त्याची 10 हजार रिटेल दुकान असतील आणि ऑफलाईन माध्यमातून त्याच्या व्यवसायात 50 टक्के भागीदारी होईल. 2014 मध्ये फक्त ऑनलाईन ब्रँडच्या रूपात भारतात पाऊल ठेवणारी शाओमी देशात 'एमआय स्टुडिओ' नावाचे रिटेल स्टोअर सुरू करत आहे.
 
शाओमीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनु जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "सुमारे दोन वर्षांपूर्वी आम्हाला असे वाटले की ऑनलाईन विक्रीमध्ये आमचा भागीदारी 50 टक्के आहे पण आमची ऑनलाईन विक्री जवळपास नव्हतीच. म्हणूनच आम्ही आमचे ऑफलाईन विस्तार सुरू केले." सध्या कंपनीचे तिन्ही प्रारूप एमआय होम्स (75 अनुभव केंद्र), एमआय प्रेफर्ड पार्टनर्स (किरकोळ दुकाने) आणि एमआय स्टोअर (लहान शहरांमध्ये) मध्ये 6,000 पेक्षा अधिक किरकोळ दुकाने आहे.
 
जैन पुढे म्हणाले, '2019 च्या शेवटापर्यंत या चार ऑफलाईन माध्यमांद्वारे 10,000 पेक्षा अधिक किरकोळ दुकाने उघडण्याचा आमचा उद्देश्य  आहे. या वर्षाच्या शेवटी आमच्या स्मार्टफोनची एकूण विक्रीत ऑफलाईन माध्यमांचे योगदान 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.'