शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा चुनाव 2024
  3. ओडिशा विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : सोमवार, 8 एप्रिल 2024 (18:04 IST)

Odisha : आमदार सुरेंद्र सिंह भोई यांनी 38 वर्षानंतर सोडले काँग्रेस, भाजप मधून पण 2 नेत्यांचा राजीनामा

bhajap
Odisha MLA Surendra Singh Bhoi left Congress after 38 years : ओडिसा मध्ये काँग्रेसचे 3 वेळेस असणारे आमदार आणि पूर्व मंत्री सुरेंद्र सिंह भोई यांनी 38 वर्षानंतर पक्षच्या प्राथमिक सदस्यचा राजीनामा दिला आणि सत्तारूढ बीजू जनता पक्ष(बीजद) मध्ये सहभागी झालेत. 
 
दूसरी कडे, भारतीय जनता पार्टीच्या दोन नेत्यांनी पक्षाला राजीनामा सुपूर्त केला. ज्यांची बीजदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या नेत्यांमध्ये नीलगिरि मधून  आमदार सुकांत नायक आणि पार्टीचे कटक जिल्हा अध्यक्ष प्रकाश चंद्र बेहरा सहभागी आहेत. कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पात्रामध्ये सुरेंद्र सिंह भोई यांनी म्हंटले की, त्यांनी बोलंगीर जिल्हा कांग्रेस कमेटी (डीसीसी) च्या अध्यक्ष पदा सोबत पक्षातून देखील राजीनामा दिला आहे. 
 
ते, म्हणालेत की, व्यक्तिगत कारणांनी प्राथमिक सदस्यता आणि डीसीसी, बोलंगीर अध्यक्ष पद सोबत एआईसीसी सदस्याचा राजीनामा देऊ इच्छित आहे. 38 वर्षांपर्यंत  समर्पण आणि अनुशासन सोबत पक्ष आणि माझ्या राज्याची सेवा करण्याची मला संधी दिल्या बद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. 
 
त्यांनी राज्यामध्ये सत्तारूढ दलच्या मुख्यालय शंख भवनमध्ये बीजदचा हात पकडून घेतला. भाजप आमदार सुकांत नायक यांनी देखील पक्षाला राजीनामा दिला. पक्षाची ओडिसा इकाईचे अध्यक्ष मनमोहन सामल यांना लिहलेल्या पत्रामध्ये नीलगिरिचे आमदार नायक म्हणाले की, मी आज (म्हणजे 29.03.2024) ला भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देतो. कृपया याला स्वीकार करावा. 
 
नायक 2014 मध्ये नीलगिरितुन बीजदच्या टिकट वर विधानसभेसाठी निवडले गेले होते. ते 2019 मध्ये भाजप मध्ये गेले होते आणि सीट जिंकली देखील होती. बीजदच्या सूत्रांनी सांगितले की, नायक यांनी आता त्या पक्षामध्ये परत जायचा निर्णय घेतला आहे. जिथून त्यांनी सुरवात केली होती. चित्रकोंडाचे पूर्व आमदार आणि बीजद नेता डंबरू सिसा यांनी देखील पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. 
 
बीजद अध्यक्ष नवीन पटनायक यांना लिहलेल्या पात्रात सिसा म्हणाले की, माझे लक्ष्य आणि उद्देश्य तिथेच राहील. जे सुरवातीपासून राज्य आणि निर्वाचन क्षेत्राच्या  लोकांची सेवा करीत आहे. मला असे वाटते की, मी आता या पक्षामध्ये असे करण्यासाठी असमर्थ आहे. यासाठी आपले लोक आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या  आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी माझी इच्छा आहे की, ​​नवीन सुरवात करण्यासाठी सदैव तत्पर असणे चांगले असते. 
 
हा घटनाक्रम कटकतुन सांसद भर्तृहरि महताब आणि पूर्व सांसद सिद्धांत महापात्रच्या गुरुवारला दिल्लीमध्ये भाजप मध्ये सहभागी होण्याच्या एक दिवस नंतर झाले. महताब यांनी 22 मार्चला बीजद मधून राजीनामा देऊन दिला. ओडिसामध्ये 13 मे पासून 1 जूनच्या मध्ये चार टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत होईल.