रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (15:01 IST)

दहावी गणिताचा पेपर फुटला

बारावीचा पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये पेपर आढळल्याचे सांगितले जात आहे. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
परवानगी नसतानाही दहावीच्या परीक्षा केंद्रावर हॉलमधील फोटो काढल्यामुळे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घडला आहे.
 
13 मार्च रोजी गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. 15 मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर संशय आल्यामुळे तिच्या मोबाईलची झडती घेतली गेली. तेव्हा गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आले. 
 
पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.