बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (14:20 IST)

भाजप आमदाराची पुणे पालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजप आमदाराने पालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. ही घटना काही महिन्या पूर्वीची असून यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.

संबंधित महिला अधिकारी महापालिकेच्या ड्रेनेज विभागावर कार्यरत आहे.त्यांच्याशी एका कामाच्या संदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून संपर्क केला.मला काही व्ररिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी या कामासाठी घ्यावी लागेल असे म्हटल्यावर आमदार महिला अधिकाऱ्यावर चिडले आणि फोन स्पीकरवर ठेवायला सांगून अवोर्च्च भाषेत शिवीगाळ केली.त्यांनी काही अधिकाऱ्यांचे नाव घेऊन धमकावले.सध्या या घटनेचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.या घटनेवरून भाजपच्या आमदारा विरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहे.