Festival Posters

मुलाच्या अभ्यासावरून आईची आत्महत्या

मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (14:25 IST)
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक भयानक घटना घडली आहे. मुलांचा अभ्यास घेताना पत्नी मुलगावर रागावली म्हणून पतीने पत्नीला रागावून बोलला आणि त्यामुळे निराश झालेल्या पत्नीने बेडरुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
 
का झाला वाद?
रोहिणी राकेश थोरात (वय 25) असं मयत विवाहितेचं नाव आहे. तर राकेश थोरात असं पतीचं नाव आहे. या घटनेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकची माहिती दिली. रोहिणी थोरात यांचे पती राकेश थोरात कामावरुन घरी आले, त्यावेळी रोहिणी या मुलाचा अभ्यास घेत होत्या.
 
मुलगा नीट अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी यांनी त्याला हाताने मारहाण केली. हे बघितल्यानंतर राकेश थोरात यांनी मध्ये हस्तक्षेप करून 'अभ्यासासाठी मुलाला मारू नको, असं रोहिणी यांना रागाच्या स्वरात म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुलाला जवळ घेतलं. 
त्यावरून रोहिणी नाराज झाल्या. या घटनेनंतर रोहिणी यांनी बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास भिगवण पोलिसांकडून केला जात आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

गोकुळ गीते शिंदेसेनासोबत काम करणार, सहयोगी सदस्य बनले

चंद्रपूरमध्ये पहिल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला, वीज आणि इंटरनेट पुरवठा विस्कळीत

मॉन्ट्रियलमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार; बंदूकधाऱ्याने एका अधिकाऱ्याला ठार केले

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर २ सुरू झाले, आमदारांमध्ये संभाव्य फुटीच्या चर्चां

बस कंडक्टरकडून धावत्या एमएसआरटीसी बसमध्ये एका महिलेचा विनयभंग

पुढील लेख
Show comments