सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:22 IST)

पुण्यात दारु पिताना शिवीगाळ केल्यावरुन तरुणाचा खून; तिघे ताब्यात

दारु पित बसले असताना शिवीगाळ केल्याने तिघांनी धारदार हत्याराने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तरुणाचा खून केला.मंदार जोगदंड (वय २३, रा. साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील ( सई हेरिटेज सोसायटीचे मंदिराजवळ  पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुभम दत्ता अडसुळ (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
 
त्यावरुन पोलिसांनी सोन्या खुळे, राजू कोतवाल, इजगद, चेतन बनसोडे (रा. सर्व दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. मंदार, सोन्या खुळे व इतर हे सोमवारी रात्री दारु पित बसले होते. त्यावेळी मंदार याने सोन्या खुळे याला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरुन खुळे याने त्याच्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावले. खुळे व राजू कोतवाल यांनी धारदार हत्याराने व साहिल इजगल व चेतन बनसोडे यांनी मंदार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात मंदार याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.