मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (07:51 IST)

आता पुण्याहून आणखी एक भारत गौरव रेल्वे सुरु केली जाणार

bharat gaurav railway
भारत गौरव रेल्वे संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत योजने अंतर्गत भारत गौरव रेल्वे सुरु केली जात आहे.
=विशेष म्हणजे या भारत गौरव रेल्वेला रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून चांगली पसंती दाखवली जात आहे. दरम्यान आता पुण्याहून आणखी एक भारत गौरव रेल्वे सुरु केली जाणार आहे. ही गाडी उत्तर भारतात सोडली जाणार आहे.
 
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी भारत गौरव रेल्वे 22 जून 2023 रोजी पुण्यातून उत्तर भारतात सोडली जाणार आहे. ही गाडी पुण्याहून उज्जैन-आग्रा-मथुरा-हरिद्वार-ऋषिकेश-अमृतसर-वैष्णोदेवीला जाईल आणि मग परत 1 जुलैला पुण्याला येणार आहे. म्हणजे जवळपास नऊ दिवसाची ही यात्रा राहणार आहे.
 
निश्चितच उत्तर भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ही एक गुड न्यूज राहणार आहे. दरम्यान आता आपण या प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणकोणत्या मंदिरावर दर्शन घेता येणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
 
या मंदिरात घेता येणार दर्शन
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वंदे भारत गौरव रेल्वेने यात्रा केल्यास पर्यटकांना ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, कृष्ण जन्मभूमी, ऋषिकेश (विशेष म्हणजे ऋषिकेश मध्ये गंगा आरतीचा देखील लाभ पर्यटकांना घेता येणार आहे), तसेच सुवर्ण मंदिर आणि वैष्णोदेवीचे दर्शनही या यात्रेदरम्यान पर्यटकांना घेता येणार आहे.
 
या पर्यटन स्थळाचे होणार दर्शन
या यात्रेदरम्यान पर्यटकांना उत्तर भारतातील महत्त्वाच्या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. या सोबतच या यात्रेदरम्यान ताजमहाल आणि वाघा बॉर्डरवर देखील पर्यटकांना जाता येणार आहे.
या महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी भारत गौरव रेल्वेसंदर्भात अधिक माहिती www.irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor