बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:41 IST)

पुण्यात स्थिती गंभीर, PMC ने लष्कराकडे मागितली मदत

देशात कोरोना विषाणूची स्थिती भयावह होत चालली आहे. देशभरात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या पोहचत असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. पुण्यात देखील स्थिती अत्यंत गंभीर असून कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणंही कठिण होत चाललं आहे. अशी स्थिती बघता पुणे महानगरपालिकेनं लष्कराकडे मदत मागितली आहे.
 
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचारासाठी पुजवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले असले तरी यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात मोठ्या प्रमाणात आयसीयू आणि व्हेटिलेटर बेडचा तुटवडा जाणवत आहेत. पुण्यात 489 बेडला व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे अशात मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत असल्यामुळे हेळसांड होताना दिसत आहे.
 
पुण्यातील प्रायव्हेट आणि शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता जाणवत असून अतिशय गंभीर दृश्य तयार होत आहे. यामुळे पीएमसीने भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे. 
 
पुण्यात भारतीय लष्कराचं एक मोठं रुग्णालय असून यात 335 बेड आणि 15 व्हेंटीलेटरची अद्ययावत सुविधा आहे. पुणे महानगरपालिकेनं या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मदत मागितली आहे.