बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (09:09 IST)

धक्कादायक आईच्या गर्भातच बाळाला कोरोना

देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ससून रुग्णालयात आईच्या गर्भातच बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही देशातील पहिलीच घटना असून त्यामुळे डॉक्टरही चकित झाले आहेत.
 
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आईच्या गर्भात नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. यापूर्वी राज्यात बाळाला प्रसूतीनंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना आहे, असे ससूनच्या अधिष्ठातांनी सांगितले. या महिलेची प्रसूती होण्याच्या एका दिवसाआधी तिला ताप आला होता. त्यामुळे या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु तिच्या शरीरात अँन्टीबॉडीज आढळल्या होत्या. याचा अर्थ या बाळाच्या आईला कोरोना यापूर्वीच होऊन गेला असावा, असे डॉक्टरांचे मत आहे. कदाचित त्यामुळे गर्भाशयातच बाळाला लागण झाली असावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.