रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : शनिवार, 9 एप्रिल 2022 (17:29 IST)

आरती रामाची - जयदेव जयदेव जयजय श्रीरामा

ram aarti
जयदेव जयदेव जयजय श्रीरामा । आरती ओवाळूं तुज मेघश्यामा ॥धृ॥
लीला दाउनि अगणित आले पंचवटीं । वसते झाले येउनि गंगातिरनिकटीं । सीता लक्षूमण रघुविर धोर्जटी । चवदा वर्षें केल्या तपाच्या कोटी । १ जयदेव ॥
दंडुनिया रजनीचर कांता सोडविली । तेहतिसकोटि देवाची सुटका केली ॥ जयदेव ॥२॥
आडवि जाउनि अवघी ऋषीमंडळी । श्रीरामासि अणिलें गोदातिर जवळी । वामांकावरि सीता शोभे ते काळीं । नीरंजन आरति घेउनि ओवाळी ॥३॥ जयदेव ॥