आता राज ठाकरेही महाराष्ट्र दौर्यावर!
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील महाराष्ट्र दौर्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौर्यात ते महाराष्ट्रातील समस्या जाणून घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौर्यानंतर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे। मुंबई, नाशिक, पुणे दौर्यानंतर ते मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी मनसेचे 12 आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस राज्याच्या विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या दौर्यात स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करणार आहे.