1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुधात भेसळ करणे अजामीनपात्र गुन्हा

मुंबई- दुधात भेसळ करणे हा अजामीनपात्र गुन्हा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून भेसळ प्रतिबंध कायद्यासाठी राज्याच्या स्तरावर कडक नियम केले जातील, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री गिरीश बापट यांनी केली. 
 
विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावी धाड टाकून दुधाच्या भेसळीप्रकरणी केलेल्या कारवाईबाबतच्या प्रश्नावरील चर्चेत ते बोलत होते. भारत भालके यांनी विचारलेल्या मूळ प्रश्नावरील चर्चेत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रशांत बंब आदींनी अनेक प्रश्न विचारले.