शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (09:24 IST)

राज्यात परतीचा पाऊस दोन दिवसात जबरदस्त बरसण्याची शक्यता

महाराष्ट्रात कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या दोन  दिवसात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. परतीचा पाऊसजवळपास सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रियआहे. त्यामुळे हवामान विभागाच्या याइशाऱ्याकडे लक्ष लागलं आहे.तर दुसरी कडे पाऊसाने राज्यात जोरदार हजेरी
देत मुंबई , मराठवाडा आणि नांदेड येथे हजेरी लावली आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातं विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
*लातूर पाऊस अपडेट*

देशात प्रथमच वाॅटर रेल म्हणजेच रेल्वेने जेथे पाणी नेले त्या लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला असून औराद शहाजानी परीसरात पाणीच पाणी झाले आहे .तगरखेडा बॅरेजच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहिले असून .साकोळ, घरणी, मसलगा मध्यम प्रकल्प भरले आहेत . ले मांजरा, तेरणा नदीवरील सर्वच बंधारे
भरल आहे.बहुतांश लघु, पाझर तलावात पाणी निर्माण झाले आहे . लातूर शहरास पाणी पुरवठा करत असलेल्या मांजरा, तेरणा धरणाच्या लाभक्षेञात माञ अत्यल्प पाऊस तुलनेने अंत्यत कमी पाणी धरणात येत आहे. तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यातून कर्नाटकात पाणी गेले वाहून आहे . तर लातूर मधील साई, नागझरी बंधा-यातील पाणी जानेवारीपर्यंतच पुरेल इतका पाणी साठा आहे.त्यामुळे महापालिकेने जपून पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.