रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 20 जून 2016 (10:41 IST)

शिवसेना स्वबळावर लढणार : उद्धव ठाकरे

महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, माहित नाही, पण स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकले आहे. गोरेगावमध्ये शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

‘देश बदल रहा है’, पण परिस्थिती अजून बदलली नाही, अशी टीका उद्धव यांनी मोदींवर केली. अच्छे दिन सोडा, पण किमान बरे दिन तरी आणा असं म्हणत ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदींवरही शंरसंधान करण्याची संधी सोडली नाही.

लाचार युती करण्यात आम्हाला रस नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं आहे. इतकंच नाही, तर वाघ आणि सिंहाच्या लढाईमधून काहीच साध्य होणार नाही, असं म्हणत हा बाष्कळ वाद थांबवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं.