deepawali
✕

10वी आणि 12वीच्या परिक्षाही पुढे ढकलणार !

Updated: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (20:19 IST)
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10वी आणि 12वीच्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेणे अशक्य दिसत असल्याने परिक्षा ऑनलाईन घेता येईल का? यादृष्टीने आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पालक यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांची मते जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीची प्राथमिकता ही तुमच्या आरोग्याच्या रक्षणाची आहे. त्यामुळे या परिक्षा घेतानाही तुमचे संरक्षण कसे करता येईल याबाबतची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
 
यासंदर्भात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकाळी ट्विट करत राज्यातील 10वी आणि 12वीच्या परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही जणांनी त्यांच्याकडे मागणी केल्याची माहिती दिली. तसेच यासंदर्भात मंत्रिमंडळातील सहकारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना यासंदर्भात कळविणार असल्याचे सांगत परिस्थिती पाहून त्या योग्य निर्णय घेतील असे सांगितले.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

ग्लेन मॅक्सवेलने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

LIVE: महाराष्ट्र सागरी उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनेल

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हवाई हल्ला, गुजरातचा एक खलाशी ठार; १३ जणांची सुटका

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: महत्त्वाच्या तारखा, परंपरा आणि भाविकांसाठी माहिती

WhatsApp स्टोरेज भरले आहे? जागा मोकळी करण्याचे मार्ग

पुढील लेख
Show comments