सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (18:25 IST)

येत्या 15 दिवसात 2 मंत्री राजीनामे होतील: चंद्रकांत पाटील

पुढील 15 दिवसात आणखी दोन मंत्री राजीनामे होतील, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "आज मी पुन्हा बोलतो की, पुढील 15 दिवसात आणखी 2 मंत्र्यांचे राजीनामे होतील आणि तसं खरंच झालं तर मग पुन्हा म्हणा मला कसं कळतं? हे कोणीही सांगू शकतं. हे सर्वसामान्य माणसाला पण दिसत आहे."
 
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?"
 
वाझे प्रकरणात मोक्का कायदा लावण्याची मागणी चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
 
"वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, या प्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा," अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.