रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (10:31 IST)

Parbhani News सेप्टिक टँकमध्ये 5 मजुरांचा मृत्यू

death
गुरुवार,रात्री  परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात  शौचालयाच्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना श्वास गुदमरून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार 11 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. एका शेतातील आखाड्यावरच्या सेप्टिक टँकच्या साफसफाईचं काम सहा मजूर करत होते. दुपारी तीन वाजल्यापासून हे काम सुरू होतं. रात्रीच्या वेळी मजुरांना गुदमरू लागले. त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागल्यानं आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. 
 
मजुरांना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं.  जखमी मजुरास परळीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मजूर एकाच कुटुंबातील असल्यानं या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.