बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (09:54 IST)

नाशिक अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

accident
नाशिकच्या सिन्नर मोहदरी घाटात3 वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
 सिन्नरजवळ मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून पलिकडच्या लेनवर जाऊन आदळळी. यात 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिकचे असून ते एका लग्नसोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते. दुपारच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली, यानंतर माळेगाव एमआयडीसी पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. यातील जखमींना सिन्नर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
Edited by : Smita Joshi