रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (23:30 IST)

अहमदनगर मध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून 7 वर्षीय मुलीवर अत्याचार,आरोपीला अटक

minor
घराच्या अंगणात खेळणाऱ्या 7 वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अहमदनगरला घडली आहे. पीडित मुलगी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी एकटी होती. मुलीचे आईवडील मोलमजुरीचे काम करतात. आरोपी हा चिमुकलीला तीनचार दिवसांपासून कधी चिप्स तर कधी पाणीपुरी, चॉकलेट देत असे, मुलीची आई कामावर गेल्यावर आरोपी मुलीला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून मंगलकार्यात घेऊन गेला त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. युसूफ कुरेशी असे या आरोपीच नाव आहे. 
घडलेली घटना मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी तातडीनं इतर नातेवाईकांशी संपर्क केला नंतर पीडित मुलीच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेला सदर घटनेची माहिती दिली. संस्थेच्या स्वयंसेवकांनी पीडित मुलीच्या आईला घेऊन पोलिसात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली.