शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (12:57 IST)

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल

Manoj Jarange
मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी एकेरी आणि अपशपब्द तसेच खालच्या भाषेत टिका केल्यामुळे राज्य सरकार ज्याने आता पर्यंत सबुरीचे धोरण बाळगले होते. ते आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.  मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण पहिल्यांदाच सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
राज्यसरकारकडून जवळपास कालपासून 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रास्ता रोको आंदोलनासाठी लोकांना प्रवृत्त केल्या बद्द्ल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या माहितीनुसार, बीड मध्ये मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.आंदोलकांनी रास्ता रोक आंदोलन केल्यामुळे बीडमधील सामान्य जनतेला वाहतूक कोंडिला सामोरे जावे लागले. 

जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अज्ञाताने एसटी महामंडळाची बस पेटवल्याची माहिती समोर आली आहे.तीर्थपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाची अंबड आगाराची अंबड वरून आलेली अंबड- रामसगाव बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
 
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व बस बंद करण्यात आलेल्या आहे. पुढील आदेशापर्यंत जालना जिल्ह्यातील बस बंद राहतील अशी माहिती विभागीय नियंत्रक प्रमुख नेहुल यांनी दिली.
Edited By- Dhanshree Naik