गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

पुणे : डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातील आकुर्डीत इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. आशिष दीपक पाऊसकर (२२ ) असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ  हा अपघात झाला. हा विद्यार्थी सिम्बॉयसिस महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.

आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.आशिष त्याच्या मित्रासोबत गुरुवारी सकाळी, अ‍ॅक्टिवावरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात असताना त्याला डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात तो जागीच ठार झाला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.