शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2017 (10:04 IST)

सुकाणू समिती सदस्य सरकारच्या मंत्रिगटाची भेट घेणार

  • राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते आणि सुकाणू समितीतील सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.  तसेच सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी सुकाणू समितीतील 35 सदस्यांपैकी 15 जणांचं शिष्टमंडळ सरकारच्या मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतील, असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलंया बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, राजू शेट्टी यांनी अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असं स्पष्ट केलं. दुसरीकडे रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला. तर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलनाचं केंद्र नाशिकच राहणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.