शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (08:44 IST)

गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी आमदाराच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्यानं चिमणरावांची थेट मुख्यमंत्री शिंदेंकडेच तक्रार

अमरावतीमधला बच्चू कडू  विरुद्ध रवी राणा वाद संपत नाही तोच जळगावात नवा वाद उफाळून आला आहे. पाणीपुरवठांत्री गुलाबराव पाटील  विरुद्ध पारोळ्याचे शिंदे समर्थक आमदार चिमणराव पाटील एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत. गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्यानं चिमणरावांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडेच तक्रार केली आहे. गुलाबराव विरोधकांना बळ देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
शिंदे गटात नाराजी की फूट? 
मंत्रिपदावर वर्णी न लागल्यानं शिंदे गटातील अनेकजण नाराज आहेत. आमदार संजय शिरसाटांनी  उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. ओवळा माजिवडा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यावरून थेट मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात वादाची ठिणगी उडाली. आता अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. याच वादामुळे वेगळ्या वाटेनं जाण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. तर भाजपनं बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलाय.

Edited By- Ratnadeep Ranshoor