रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:41 IST)

13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार एका आरोपीला अटक

सांगली जिल्ह्यात संताप करणारी घटना मिरज शहरात घडली असून, यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर  प्रकरणी पोलिसानी एका आरोपीला अटक केली. मात्र मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरूनच एका आरोपीला तात्काळ अटक केली आहे. तर पोक्सोनुसार (POCSO) कारवाई सुरु असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथे रहिवासी असलेल्या एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.. याबाबत मिरज शहर पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे की, “माझ्या मुलीला घराजवळून जबदस्तीने उचलून नेण्यात आलं. चार तरुणांनी मिळून मिरजेतील मास्टरशेफ हॉटेलाच्या मागील बाजूस एका रुममध्ये तिला नेलं, तिथे तिला इंजेक्शनद्वारे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं. मुलगी बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला. कामील नदाफ, फरहान ढालाईत, फुरकान, आणि फारूक ढालाइत अशी आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.