गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (15:55 IST)

वाचा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवसापासून विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यासाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले असल्याने अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्र काढलं या परीक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांना करावी आता पुन्हा परीक्षेची प्रतीक्षा करावी लागणार आहे 
 
कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे परीक्षाच रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असावी कारण कर्मचारीनी आंदोलन केल्याने परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना परीक्षेचे काम न झाल्याने परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला तर आता केव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील व केव्हा निकाल जाहीर होतील हा प्रश्न उपस्थित झाला आहे.