सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , सोमवार, 24 एप्रिल 2017 (12:50 IST)

अलिशान गाड्यातून देशी दारुची तस्करी

जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीच्या दोन घटना रात्री उघडकीस आल्या. इंडिगो आणि इनोव्हा कारमधून देशी दारूची तस्करी केली जात होती. 
 
वैजापूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली असता रात्री उशिरा कारवाई करत १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वैजापूर- गंगापूर रस्त्यावर सापळा लावून कारवाई केली असता. 
 
इंडिगो कारमधून देशी दारूचे १५ बॉक्स सापडले. तर इनोव्हा कारमधून १७ बॉक्स ताब्यात घेण्यात आले. पहिल्या घटनेत कारसह १ लाख ७७ हजारांचा, तर दुसऱ्या गुन्ह्यात १२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
 
औरंगाबाद येथील पदमपुऱ्यातील रहिवाशी असलेल्या घनश्याम बरंडवाल आणि वैजापूर येथील राहुल कुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.