रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2017 (10:49 IST)

नाशिक: काचेच्या दरवाजावर आदळल्याने मुलाचा मृत्यू

नाशिकमध्ये चार वर्षाचा चिमुरडा घरात खेळत असताना काचेच्या दरवाजावर आदळून पोटात काच घुसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. साईश केशव पवळे (४) असे त्याचे नाव आहे.

घरात  खेळत असलेला साईश गॅलरीतील काचेच्या दरवाजावर आदळला. त्यावेळी दरवाजाची काच साईशच्या छातीत व पोटात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.  साईशला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुपारी साडेचारच्या सुमारास उपचार सुरू असताना साईशचा मृत्यू झाला.