रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (18:30 IST)

नागपुरात ट्यूटरवर मुलांना वर्गमित्राला पेनने दुखापत करायला सांगितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

crime
नागपुरात एका 45 वर्षीय शिकवणी शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना वर्गमित्राला पेन ने दुखापत करायला सांगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना वर्गमित्राला पेन ने टोचण्यासाठी बाध्य करत होता. ही घटना मंगळवारी शिकवणी दरम्यान घडली. 

शिकवणी घेत असताना एका पाच वर्षाच्या मुलाने आपल्या भावाला पेन ने टोचले नंतर शिक्षिकेने सर्व मुलांना आपल्या मोठ्या भावासोबत असे करण्यास सांगितले. या प्रकरणाची माहिती मुलाच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलांच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलांसोबतची ही वागणूक त्यांनी अयोग्य असल्याचे म्हटले.

यशोधरा नगर पोलिसांनीशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तक्रार दाखल केल्यांनतर प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीस अधिकारी म्हणाले, अशा घटना पुन्हा घडू नये आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे याची काळजी आम्ही घेऊ असे सांगण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit