शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (08:53 IST)

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘शिवसृष्टी’ला भेट

pramod sawant
पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे साकारलेल्या ‘शिवसृष्टी’ला आज भेट दिली. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास विविध प्रसंगातून आणि दुर्गदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत असल्याचा आनंद डॉ. सावंत यांनी या वेळी व्यक्त केला.
 
‘शिवसृष्टी’तील सरकारवाडय़ात उभ्या केलेल्या ऐतिहासिक थिम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन ही शिवसृष्टी आता नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी या शिवसृष्टीला आज भेट दिली. यावेळी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, अरविंदराव खळदकर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. गोव्यात सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार करून छत्रपतींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे भाग्य गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो, अशा भावना डॉ सावंत यांनी यावेळी व्यक्त केल्या.
 
Edited By - Ratnadeep ranshoor