शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दिवाळीची साफसफाई करताना मृत्यू

death
Jalgaon News जळगाव शहरातील बोहरा बाजार येथील फटाका विक्रेत्याच्या घराची साफ-सफाईसाठी पाठवण्यात आलेल्या बालमजुराचा उघड्या विद्युत तारेवर पाय पडून जागीच मृत्यू झाला. मूळ मन्यारखेडा-भुसावळ येथील रहिवासी सुनील संजय चव्हाण (वय 16) असे मृतकाचे नाव आहे.
 
दिवाळीचा सण आल्याने घर असो वा दुकान सर्वींकडे साफ-सफाईची कामे सुरू आहेत. अशात साफसफाई करताना निष्काळजीमुळे एका अल्पवयीन मुलाच्या जिवावर बेतली आहे. ही घटना गणेश कॉलनीत घडली. सुनील हा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करत होता. बोहरा बाजारात अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सुनील आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे अशा दोघांना त्यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी पाठवले होते. बुधवारी सकाळी घरची साफसफाई करत असताना सुनीलचा पाय खाली पडलेल्या विद्युत तारेवर पडला आणि तारेतून पूर्ण क्षमतेने वीजप्रवाह सुरू असल्याने सुनीलला जोरदार विजेचा झटका लागून तो जागेवर कोसळला.
 
सुनीलला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.