सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (09:53 IST)

अजित पवारांबद्दलचा निर्णय मेरिटवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde ajit panwar
2 जुलै 2023 रोजी महायुतीत सहभागी होत शरद पवारांच्या विरोधात बंड पुकारले. पक्षातील बहुसंख्य आमदारांना त्यांनी आपल्या बाजूने उभे केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. निवडणूक आयोगातही या संबंधीची याचिका दाखल केली, त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल केले. या निर्णयाचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. अजित पवार यांच्याबाजूने सर्वाधिक आमदार असल्यामुळे आयोगाने त्यांच्याबाजून निर्णय दिला. या निर्णयाचा महायुतीला फायदा होणार आहे.
विधिमंडळातही अजित पवारांच्याच बाजूने निर्णय येईल, असाही विश्वसा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की लोक कामाला महत्त्व देतात. चौफेर विकास राज्यात होत आहे. केंद्र सरकारचं पाठबळ आमच्यासोबत आहे. डबल इंजिनचं सरकार बुलटे ट्रेन वेगाने धावत आहे. आमचं सरकार सामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक खासदार आमचे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर विधानसभा निवडणुकीतही महायुती बहुमताने विजयी होईल, असे ते म्हणाले.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor