सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:54 IST)

क्रेडीट कार्डचे थकीत बिल भरले नाही म्हणून केली शरीरसुखाची मागणी

क्रेडीट कार्डचे थकीत बिल भरले नाही म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघड झाला आहे.कंपनीच्या वसूली एजंटने या महिलेला शिव्यागाळ केली. या सगळ्यानंतरही औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्त्यांनाच त्रास दिला.
 
औरंगाबादच्या सोनी कुटूंबियांना पोलिसांनी तक्रार केल्यानंतर ही दाद दिली नाही.सोनी यांच्या पत्नीकडे क्रेडीट कार्ड होते.त्यावर त्यांनी 46 हजारांची खरेदी केली त्यातील 25 हजार भरले मात्र लॉकडाऊनमुळे धंदा थोडा कमी झाला आणि क्रेडीट कार्ड बिल थकलं.त्यामुळं कंपनीकडून वसूलीसाठी फोन यायला लागले.
 
सुरुवातीला थोडंबहूत बोलल्यानंतर कंपनीचे लोक थेट शिवीगाळ करू लागले, इतकंच नाही तर पैसै भरायला नसतील तर शरीरसंबंधांची मागणी या कंपनीच्या वसूली एजंटने केली. इतकंच नाही तर या महिलेच्या वडिलांचा नंबर शोधून त्यांनाही अपशब्द वापरले.
 
अखेर वैतागलेल्या सोनी यांनी थेट एमआयडिसी सिडको पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.एका महिलेला अशी मागणी करणं गुन्हाच मात्र तरी सुद्दा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुलै महिन्यात तपासासाठी इन्क्रेडीबल इंडिया या दिल्लीच्या कंपनीत चौकशीला जायचं असे पोलिसांनी सांगितले, तिथं जावून थातुर मातूर चौकशी पोलिसांनी केली आणि तेथून तक्रारदारालाच वैष्णव देवीचे तिकीट काढून पोलिसांनी फुकट तिर्थयात्रा सुद्दा केली.