शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2017 (09:08 IST)

शेतकरी कर्जमाफी यादीत कोणतही गोंधळ नाही

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर मुंबई येथील जे शेतकरी आकडेवारी आहे ती सुद्धा योग्य आहे. त्यात कोणतीच चूक नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील जी आकडेवारी होती त्यात मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या आकडेवारी नुसार  मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री जरी स्पष्टीकरण करत असले तरीही जो पर्यंत हे शेतकरी कोण आणि कुठे शेती करतात ते जो पर्यंत समोर येत नाहीत तो पर्यंत हा वाद सुरूच राहणार आहे.